नांदेड लोकसभेचे काॅंग्रेस पक्षाचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार बायपास येथील राजगड जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा आमदार बोंढारकर यांच्या कडून यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील व मतदारसंघातील सामाजिक, राजकीय, विविध विकासात्मक विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आज सायंकाळी आमदार बोंढारकर यांच्या कडून प्राप्त झाली आहे.