चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथे मोबाईल विकला म्हणून मुलांचा बापावर चाकूने हल्ला केल्याची घटना दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता घडली याबाबत बापाने दोन मुलांविरुद्ध चिखलदरा पोलीसात तक्रार दाखल केली.घटनेतील आरोपी सुमित उमेश दांडोळे वय १९ वर्ष व अमित उमेश दांडोळे वय १८ वर्ष हे मोबाईल मध्ये अष्लील विडीओ पाहत असता फिर्यादी उमेश मोंगू दांडोले यांनी त्यांच्या कडून मोबाईल हिसकावून दोघानाही थापडाने मारले आणि बाहेर जावून मोबाईल विकला.