Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: अकोला शहरात पावसामुळे नागरिकांचे हाल; वंचित बहुजन आघाडीची मदतीची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली मागणी

Akola, Akola | Aug 31, 2025
अकोला शहरातील अरुंद नाले, रस्ते आणि अपुऱ्या निचऱ्यामुळे मुसळधार पावसात नागरिकांचे मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निवेदन देत नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांनी प्रत्येक प्रभागातील नाले रूंद करण्याचे, कायमस्वरूपी स्ट्रीटलाईट लावण्याचे, नाल्यांची साफसफाई करण्याचे व भविष्यातील उपाययोजनांचे मागणीपत्र सादर केले. खरप, न्यू तापडिया नगर, गुड्धी या भागात प्रचंड नुकसान झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us