गेल्या सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरण क्षेत्रात हजेरी लावली आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडण्यात आला आहे.सध्या धरणाचे एकूण सात स्वयंचलित दरवाजे असून त्यापैकी केवळ एक दरवाजा उघडलेला आहे. स्वयंचलित दरवाजा क्र. 3 मधून 1428 क्यूसेस इतका विसर्ग सुरू असून, त्यासोबतच BOT पॉवर हाऊस मधून आणखी 1500 क्यूसेस विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.