मोहाडी तालुक्यातील गांधी वार्ड वरठी येथे अंगणात उभी ठेवलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी अभय नीलकंठ नंदुरकर असे मोटरसायकल धारकाचे नाव असून त्याने आपली मोटरसायकल अंगणात उभी ठेवली असता अज्ञात आरोपींनी मोटरसायकल लंपास केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.