चंद्रपूर नागपूर महामार्गावर मोरवा जवळ नागपूर कडून येणाऱ्या बस क्रमांक एम एच 40 वाय 5918 या बस चंद्रपूरकडे जात असताना एक ट्रक हा वळण घेत असताना बस ट्रकला जाऊन धडकली त्यामुळे बसमधील चालकासह इतर दोन प्रवासी जखमी झाले ही घटना आज दि.28 आगस्ट रात्री 7 वाजता घडली. जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तलिहेलेपर्यंत जखमीची नावे कळू शकले नाही. सदर घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.