मांजरी येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या भरावामुळ दरवर्षी सांगली,कोल्हापूर आणि कर्नाटक सीमाभागात प्रलयंकारी महापुराची तीव्रता वाढत असल्याचा दावा माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सोमवार दि 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडे 4 वाजता केला आहे.शेट्टी पूढे म्हणाले,मांजरी या पुलाची उंची कमी असल्याने पूर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जातो.परिणामी कृष्णा नदीचे पाणी मागे साचते आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये महापुराचा सामना करावा लागतो.राजू शेट्टी यांनी प्रशासनावरही टीका केली.