लोहा शहरातील जुना लोहा येथे फिर्यादिचे राहते घरी दि २७ सप्टेंबर २०२५ दुपारी चारच्या सुमारास यातील आरोपी मलीकार्जून मटके रा. पारडी. या.लोहा.जि.नांदेड याने यातील फिर्यादीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोस दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह कमेंट केले. याप्रकरणी फिर्यादी दत्ता वाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी लोहा पोलिस ठाण्यात सार्वजनिक उपद्रव पसरविणे बद्दल गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे हे आज करीत आहेत.