भंडारा जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना लोकन्यायालयात प्रकरणे ठेवायचे आहेत. त्यांनी संबंधित न्यायालयाशी अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरने मिटविण्यात येतील.