बीड जिल्ह्यासह लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे मांजरा धरण यावर्षी तब्बल पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे धरण परिसरातील जलसाठा झपाट्याने वाढला आणि अखेर धरण काठोकाठ भरल्याने पाण्याची पातळी ओसंडून वाहू लागली. मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानले जाते. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील लहान-मोठी अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.