आज श्री गणेश चतुर्थी दिनी 'श्री' आगमन होत असून श्रीच्या खरेदी सह विविध शोभेच्या वस्तू पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, शहरातील पानसरे चौक - नरेंद्र चौक -नेहरू चौक - नगर पालिका चौक येथे विविध दुकानें असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली असून पोलिसांनी वरील मार्गांवर अवजड वाहतुकीस प्रतिबंध घातले होते, चौका चौकात पोलिस कर्मचारी देखील पाहायला मिळाले आहेत, मोठ्या उत्साहाने नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला नेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे.