महागाव तालुक्यातील तालुक्यातील काळी दौलत शेतशिवारात २३ सप्टेंबरच्या रात्री झटका मशीन चोरीची घटना घडली. शेतकरी शिवाजी गणपत मोरे यांनी वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी अंदाजे ५ हजार रुपये किंमतीची झटका मशीन चार्जिंगसाठी घरी घेऊन जाण्यासाठी दुचाकीला बांधली होती. दुचाकीवर बांधलेली झटका मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २३ सप्टेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान फिर्यादी मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली.