पंचवटी, तपोवन कॉर्नर येथे गॅस टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.तपोवन कॉर्नर भागातील अष्टविनायक स्वीट जवळ अनाधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडर टाक्यांमधून गॅस वाहनांमध्ये भरत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यात रामनाथ बाळकृष्ण सोमवंशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा औषध उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.