वाघोली-लोहगाव रोडवर अफिम विक्रीसाठी आलेल्या राजस्थान येथील तरुणाला गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने जेरबंद केले असून त्याच्याकडून २२ लाख २४ हजार रुपये किमतीचे १ किलो ११२ ग्रॅम आफिम जप्त करण्यात आले आहे. तुलसिदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. उदयपुर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.