जोशी नगर, घाटपुरी नाका येथील विवाहितेचा सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटपुरी नाका भागातील जोशी नगर येथे माहेर असलेल्या सौ. प्रणाली अक्षय डोसे (२९) यांचा विवाह अक्षय गजानन डोसे (रा. मलकापूर) याचे सोबत झालेला आहे. पती अक्षय गजानन डोसे, सासरे गजानन दयाराम डोसे, सासू जयमाला गजानन डोसे यांच्यासह सात जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .