चंद्रपूर शहरातील छत्रपती नगर, तुकुम येथील एकता गणेश मंडळ तर्फे गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने आज दि 1 सप्टेंबर ला 10 वाजता रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी तसेच विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिरामध्ये शहर व परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदानासोबतच आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल तसेच अन्य महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या.