किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील अमोल पोतदार या तरुणाने परदेशातही आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवला आहे. अनेक वर्षांपासून तो पत्नीसमवेत अमेरिकेत वास्तव्यास असून तेथेही गणेशोत्सव मोठचा उत्साहात साजरा करण्याची परंपरा त्यांनी रुजवली आहे.अमोल पोतदार हे किल्लारी येथील प्रसिद्ध डॉक्टर अशोक पोतदार यांचे चिरंजीव आहेत.