आझाद मैदानावरील आंदोलन यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक मराठा आंदोलक आले आहेत. मात्र त्यांची गैरसोय होत असल्यामुळे त्यांची नवी मुंबई महानगरपालिकेने सोय केली आहे. वाशीतील सिडको एक्जीबिशन सेंटर बाहेर आंघोळीसाठी दीडशे शावर नळ लावले असून जेवण आणि पिण्याची पाणी उपलब्ध व्हावे म्हणून 20 टँकर 24 तास तैनात ठेवले आहेत.साफसफाई साठी 100 कामगार आणि 250 पोर्टेबल शौचालय उभे केले आहेत,अशी माहिती मनपाचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.