दोडामार्ग तालुक्यातील घोटगे आणि पाळये गावांमध्ये हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. वनविभागाचे कर्मचारी, वनरक्षक आणि 'हाकारी' पथक त्यांच्या कामात हलगर्जीपणामुळे हत्तींची दहशत वाढून शेती, बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान ते करत आहेत, तरी यावर ठोस उपाययोजना करा अशी मागणी घोटगे येथील प्रगतशील शेतकरी संतोषकुमार दळवी यांनी उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्याकडे आज गुरुवार ११ सप्टेंबर रोज सायंकाळी ४ वाजता केली आहे.