गोकुळ दूध संघाच्या संपर्क दौऱ्याचा एक भाग म्हणून आज शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राधानगरी तालुका संपर्क सभा आनंद पॅलेस, शेळेवाडी येथे उत्साही वातावरणात पार पडली.या सभेला गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी), अरूणराव डोंगळे,आणि संचालक मंडळाचे सदस्य तसेच राधानगरी तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेत गोकुळ दूध संघाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.