शासनाच्या सर्व महत्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही महसूल प्रशासनाच्या खांद्यावर असून, ती जबाबदारी अत्यंत समर्पणाने पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज महसूल दिन व महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.