रावेर तालुक्यात वाघोड हे गाव आहे. या गावात सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या पाडव्यानिमित्त आई भवानी मातेची यात्रा भरवली जाते. यावर्षी देखील शनिवारी हा यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. गावातून पूजा मिरवणूक काढण्यात आली जी लक्षवेधी ठरली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत भावी भक्तांची दर्शनासाठी मंदिरात ये जा सुरू होती.