विष्णुनगर, गाळण गावाच्या लोकनियुक्त मुख्य तंटामुक्ती अध्यक्ष प्रेमसिंग अभेसिंग राठोड यांची आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजता बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थाच्या उपस्थितीत हे पद प्रेमसिंग राठोड यांना देण्यात आले, सदर पद नेहमी गावाच्या हितासाठी आणि गावाची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून व्यवस्थित व प्रामाणिक न्याय देण्याचं काम करत, प्रेम सिंग राठोड हे देखील यासाठीचे प्रयत्न करतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केली,