तालुक्यातील पळसोद येथिल सलग 187 वर्षांपासून साजरा होत असलेल्या पळसोद येथिल मारोती महाराजांच्या या ऐतिहासिक उत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडली. या यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये दिसणारा एकोपा हा खरोखर आनंद देणारा आहे. अशी भावनिक प्रतीक्रिया अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. शुक्रवारी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी पळसोद येथे भेट दिली. यावेळी त्यांचा संस्थांनच्या वतीने सत्कार करण्यात आला.