दि. २ सप्टेंबर, २०२५ च्या शासन निर्णयानुसार चुकीच्या पध्दतीने व खऱ्या प्रकारचा अभ्यास न करता तडजोडीसाठी घाईघाईत शासन निर्णय करण्यांत आला. सदर शासन निर्णयामुळे मुळातच कमी असलेल्या आरक्षणामध्ये आणखी मराठा समाजास अंतर्भत करण्याचा घाट शासनामार्फत काढलेल्या शासन निर्णयानुसार घालण्यांत आलेला आहे, हा ओ.बी.सी. साठी असणारा काळा शासन निर्णय त्वरीत रद्द करावा अशी मागणी करत दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करत ओबीसी एकीकरण समितीच्या