जय बजरंग तान्हा पोळा ऊत्सव समितीतर्फे तान्हा पोळा ऊत्सव जिजामाता वॉर्ड येथे आ. करण देवतळे यांच्या उपस्थितीत आज दि 23 आगस्ट ला 5 वाजता साजरा करण्यात आला.यावेळी बालगोपालांनी आपापले नंदी उत्कृष्टरित्या सजवीत स्पर्धेत सहभाग नोंदविला .यावेळी स्पर्धेत सहभागी बालगोपालांना कुपन वाटून बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाला आमदार करण देवतळे , शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, माजी नगराध्यक्ष अहेते श्याम अली, आदींसह उपस्थित होते.