चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून, त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी आज दि 21 आगस्टला 12 वाजता प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.