गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी नेकनूर पोलिसांच्या वतीने सोमवारी सायंकाळी लिंबागणेश येथे भव्य पथसंचलन काढण्यात आले. या पथसंचलनासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तर नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन पार पडले. पथसंचलनास सुरुवात लिंबागणेश पोलीस चौकी येथून करण्यात आली.