दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या सामाजिक समरसतेचे प्रेरक लोकदेवता रामदेवबाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोल्यातील ८५ वर्षे जुने मोठे राम मंदिर भक्तांनी गजबजून गेले. सुप्रसिद्ध भजनगायक राधेश्याम शर्मा ‘राजपुतपुरे वाले’ यांनी आपल्या मधुर वाणीतून रामदेवबाबा, श्यामबाबा व संत गजानन महाराजांची भजने सादर करून भक्तांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी हवन-पूजनही संपन्न झाले. यजमान म्हणून कुंजबिहारी जाजू, ॲड. प्रमोद अग्रवाल यांच्यासह जाजू व अग्रवाल कुटुंबीय सहभागी झाले होते