प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:१९ वाजता दिलेल्या सुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि २५ व २६ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. दि २५ व २६ ऑगस्ट ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे.