चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आज दि 25 ऑगस्टला 12 वाजता सहायक आयुक्त अनिलकुमार घुले व सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मनपाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे व उपलब्ध सोयी सुविधेचे सहायक आयुक्त यांनी स्टॉल्सला भेट देत कौतुक केले.