प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ११:३७ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्या अनुसार आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान राज कॉर्नर परिसरात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला असून मुसळधार पाऊस पडण्याची प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी शक्यता वर्तवली आहे