अकोल्यात रेल्वे स्थानकावर दादऱ्यावरून पाय घसरून युवक गंभीर जखमी; पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव वाच अकोल्याच्या अकोट येथील रमाबाई आंबेडकर नगरातील 36 वर्षीय जितू प्रमोद तेलगोटे याचा अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून दादऱ्याच्या पायऱ्यांवरून उतरताना पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमीं झालाय. दरम्यान, त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली..