गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोषात अनंत चतुर्दशी दिवशी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीला शनिवारी सायंकाळी विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला. विविध मंडळांनी गणरायाची भव्य प्रतिमा ट्रॅक्टरवर सजवली होती. अनेक ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली होती. ब्रास बँड पथक तसेच रंगावली रांगोळी कलाकारांनी चौकाचौकात काढलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधक ठरल्या. ढोल व ताशा पथकाच्या कलाकारांनी केलेले ढोल व ताशांचे वादन सर्वसाधारणचे लक्ष वेधून घेत होते.