कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजली जाधव यांच्या हस्ते शास्ञज्ञ डॉ.सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पुजनाने केले यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते तर यावेळी शालेय विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सादर केले.