एबीपी माझा तर्फे घेण्यात आलेल्या "बाप्पा C माझा महागणेश मंडळ स्पर्धेचा" निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील श्रीराम गंज बाजार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला विशेष पुरस्कार श्रेणीत पुरस्कृत करण्यात आलं आहे. एबीपी माझाच्या वतीने विजेत्या मंडळाला सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य बालू बावनथडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.