वेळोवेळी नगरपरीषदेला निवेदन देऊनही स्मशानभूमीतील समस्या निवारण्यासाठी दुर्लक्ष केल्याने अखेर मा नवदुर्गा मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येत गवराळा येथील स्मशानभूमीचा परीसर स्वच्छ करुन अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला.युवकांनी एकत्र येत स्मशानभूमी परीसरातील काटेरी झुडुपे,अवांतर कचरा व झुडूपे साफ करुन संपुर्ण परिसर स्वच्छ केला. श्रमदानात मा दुर्गा मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.