पारोळा----शहरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास खिडकीचे गज चोरणाऱ्या एका आरोपीस हटकले असता त्याने लोखंडी गज डोक्यात मारून एका डॉक्टरला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. गुजराथी गल्लीतील डॉ. मिलिंद श्रॉफ यांच्या मालकीचे बंद गोदाम असून आरोपी निलेश सोनार हा धारदार चाकूने खिडकीचे गज चोरीच्या उद्देशाने कापत होता. त्यास डॉ. मिलिंद श्रॉफ यांनी हटकले असता आरोपीने हातातील लोखंडी गज डॉ. श्रॉफ यांच्या डोक्यात मारल्याने ते रक्तबंबाळ झाले.