कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी विरोधात गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत प्रशासनाने आपणास काही कळवले नाही. याविषयी माहिती घेतो आणि जरूर तर जिल्हाधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्यास सांगतो, असा निर्वाळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. कराड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री देसाई हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते.