भंडारा जिल्ह्यातील कर्कापूर येथील बादल उर्फ आकाश राजू आगासे वय 22 वर्षे याने दिनांक 28 जुलै रोजी कारधा येथील एका ॲकॅडमीतील रूम मधील पंख्याला गळफास लावली. त्याचा मित्राला हा प्रकार माहीत होताच त्याने सर्व मित्रांना बोलवून बादल याला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला न्यूरॉन हॉस्पिटल नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले असता न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये बादल याचा दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता दरम्यान मृत्यू झाला.