यावल शहरातील पाच वर्षीय बालक हन्नान खान याच्या हत्तीच्या निषेधार्थ यावल शहरातून सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने माजी नगराध्यक्ष अतुल पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील सह विविध मान्यवरांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. जलद न्यायालयात निकाल लागावा नराधमाला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात आली.