मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे दिनांक २९ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा देत औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळके सर्कलमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दिनांक दोन सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर येहळेगाव सोळंके येथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या.