बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या हालचालींना विरोध करत आज आदिवासी समाजाने अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. आधीच भटक्या-विमुक्त प्रवर्गात आरक्षण मिळालेल्या बंजारा समाजाला आता एसटी प्रवर्गात घेऊ नये, अशी मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आली. समाजामध्ये "घुसखोरी" होऊ नये, आरक्षणाचा अन्याय होऊ नये, यासाठी सरकारने योग्य निर्णय घ्यावा, असा आग्रह होता. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभं राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा समाजासारखे गॅजेट लावण्य