महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळतात याचा जुलै महिन्यातील हप्ता बँक आणि पोस्ट कार्यालयात जमा झाल्याने त्या खात्यातील पैसे काढण्यासाठी वाशिम येथील पोस्ट कार्यालयात दिनांक 12 ऑगस्ट रोजी मध्ये गर्दी दिसून आली. ह्या पोस्ट खात्यातील पैसे काढण्यासाठी अनेक पुरुष आपल्या घरच्या महिलांना घेऊन या ठिकाणी आले होते तर फार्म भरणे पैसे काढणे यासाठी पुरुष महिला मदत करत होते त्यामुळे महिला आणि पुरुषांची गर्दी वाढली होती.