लातूर – परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पीकपाणी संकटात आले असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरीदेखील सणावाराच्या काळात शेतकरी आपल्या परंपरेनुसार उत्सव साजरा करण्यामध्ये मागे राहत नाही. याचाच प्रत्यय लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथील रत्नाप्पा बिडवे या शेतकऱ्याने दाखवून दिला. त्यांनी बैलपोळा अत्यंत दिमाखात साजरा करून आपल्या सर्जा राजाची मिरवणूक काढली. शेतकऱ्याचा नाद करायचा नाही मनात नृत्यगणांचा डॉल्बीच्या तालावर चांगला डान्स करतानाचे आज दि.22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पाहायला मिळाले