अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आज २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता पार पडली.खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांच्या हस्ते क्रिडा दिनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. नितीन चव्हाळ आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय आळशी उपस्थित होते. डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांनी मेजन ध्यानचंद यांच्या...