भरधाव वेगाने रॉंग साईड येणाऱ्या ट्रकने टव्हेरा गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये टव्हेरा चालक गंभीर जखमी झाले असून इतर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. हा अपघात पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील चक्की खापा येथे झाला आहे. गंभीर जखमी व्यक्तीचे नाव राहुल रहांगडाले असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रकचालक संजय पाटील विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.