वाघोली येथील भावडी रोड सुयोग नगर या ठिकाणी सदर कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे चार कोयते हे पोलिसांनी जप्त केले आहेत.