अकोल्याच्या हिंगणा म्हैसपूर येथे गोरक्षण ट्रस्ट कारवाई बाबत गंभीर आरोप, वंचित बहुजन आघाडीचा इशारा दिलाय अकोल्याच्या हिंगणा म्हैसपूर येथील जयराम गोरक्षण ट्रस्ट येथील जागेवर जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सर कारवाई करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवला असून, ट्रस्टच्या मालकीच्या २०० जनावरांपैकी ७४ गाई परस्पर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. उरलेल्या गाई उघड्यावर राहून उपासमारीला सामोऱ्या जात आहेत, बाकीचे जनावरे कुठे आहेत याची माहिती नाही? त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दैनिय अवस्था झाली.