यात्रा चौक सह शहरातील विविध भागांमध्ये अष्टमी पर्वावर महायज्ञ पार पडला अकोट शहरात नवरात्री उत्सवानिमित्त विविध चौकांमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शहरातील यात्रा चौक मोठे बारगण सोमवार वेस नंदीपेठ शिवाजी महाराज चौक नया प्रेस अकोला रोड कॉलेज रोड या ठिकाणीच्या विविध मंडळामध्ये अष्टमी पर्वावरती सर्वत्र महायज्ञ अनुष्ठान पार पडला तर उद्या नवमीला महानैवेद्य अर्पण करण्यात येऊन दुर्गा विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. विसर्जन मिरवणुकीचा शहरवासी मध्ये मोठा उत्साह आहे.